आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून सावध राहावे

Today Horoscope l मेष:-बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. दिवस चांगला जाईल. शुभ रंग हिरवा शुभ अंक ६

वृषभ:- आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका. शुभ रंग जांभळा शुभ अंक १

मिथुन:- नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जुगारातून लाभ संभवतो. शुभ रंग काळा शुभ अंक ९

कर्क:- अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. वैचारिक दिशा बदलून पहावी.शुभ रंग पांढरा शुभ अंक २

सिंह:- कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत. शुभ रंग विटकरी शुभ अंक ५

कन्या:- कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.शुभ रंग जांभळा शुभ अंक ७

Today Horoscope l तूळ:- इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो. शुभ रंग हिरवा शुभ अंक ३

वृश्चिक:- लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये. शुभ रंग निळा शुभ अंक ८

धनू:- दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका. शुभ रंग जांभळा शुभ अंक ६

मकर:- जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल. शुभ रंग नारंगी शुभ अंक ३

Today Horoscope l कुंभ:- फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी. शुभ रंग पिवळा शुभ अंक ७

मीन:- कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. भडक विचार मांडू नका. शुभ रंग हिरवा शुभ अंक १

महत्त्वाच्या बातम्या-

OnePlus 13 स्मार्टफोन संबंधित महत्वाची माहिती समोर! कॅमेरा असणार खास

रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! तब्बल 9 हजार पदांसाठी बंपर भरती सुरु

आजपासून सलग 3 दिवस बँका आणि शेअर बाजार बंद राहणार! पाहा मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी

भगवान महादेवाला प्रिय आहेत या वनस्पती; भोलेनाथ होईल प्रसन्न

केंद्र सरकारने महिलांना दिली खास भेट! गॅस सिलिंडर तब्बल ‘एवढ्या’ रुपयांनी केला स्वस्त