सोन खरेदी करायचंय? जरा थांबा; 120 तासांत 5 वेळा केले रेकॉर्ड ब्रेक

Gold Prices Increase l मार्च महिन्यात सोन्याचे भाव कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. गेल्या 120 तासांत सोन्याच्या किमतीने 5 वेळा विक्रमी वाढ केली आहे. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या भावाने प्रथमच 66 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे.

Gold Prices Increase l सोन्याने प्रथमच 66 हजारांचा टप्पा पार केला

शुक्रवारी संध्याकाळी सोन्याचा भाव प्रथमच 66 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, सोन्याचा भाव 66,356 रुपये प्रति दहा ग्रॅम या उच्चांकावर पोहोचला आहे. मात्र, शुक्रवारी सोन्याचा भाव एका दिवसापूर्वी 65,599 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​उघडला होता. बाजार बंद झाल्यानंतर सोन्याचा भाव 66,023 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​दिसून झाला आहे.

120 तासात 5 वेळा केले रेकॉर्ड :

गेल्या 120 तासांत सोन्याच्या किमतीने 5 वेळा विक्रम नोंदवला आहे. शुक्रवारपूर्वी, 4 मार्च रोजी सोन्याने 4 डिसेंबर 2023 चा विक्रम मोडत 64,575 रुपयांचा विक्रम केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 5 मार्च रोजी सोन्याने प्रथमच 65 हजार रुपयांची पातळी ओलांडून 65,140 रुपयांसह नवा विक्रम प्रस्थापित केला. तसेच 6 मार्च रोजी सोन्याच्या भावाने 65250 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता.

तसेच 7 मार्च रोजी सोन्याचा भाव 65,587 रुपयांवर पोहोचला होता. 8 मार्च रोजी पुन्हा भावाने 66 हजार रुपयांची पातळी ओलांडली. म्हणजेच 5 दिवसांत म्हणजेच 120 तासांत 5 वेळा विक्रमी पातळी ओलांडली आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

Gold Prices Increase l मार्चमध्ये सुमारे 3800 रुपयांची वाढ! :

मार्च महिन्यात सोन्याच्या दरात सुमारे 3800 रुपयांची वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 62,567 रुपये होता. तर 8 मार्च रोजी त्यांनी 66,356 रुपये गाठला आहे. याचाच अर्थ सोन्याच्या किमतीत 6 टक्के म्हणजेच 3,789 रुपयांची वाढ झाली आहे. जर एखाद्याने 100 ग्रॅम सोन्यात गुंतवणूक केली असेल, तर मार्च महिन्यातच गुंतवणूकदारांना सुमारे 38,000 रुपयांचा नफा झाला असेल. गेल्या वर्षभराबाबत बोलायचे झाले तर सोन्याच्या किमतीत 11,000 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.

News Title : Gold Prices Increase

महत्त्वाच्या बातम्या-

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून सावध राहावे

OnePlus 13 स्मार्टफोन संबंधित महत्वाची माहिती समोर! कॅमेरा असणार खास

रेल्वेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! तब्बल 9 हजार पदांसाठी बंपर भरती सुरु

आजपासून सलग 3 दिवस बँका आणि शेअर बाजार बंद राहणार! पाहा मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी

भगवान महादेवाला प्रिय आहेत या वनस्पती; भोलेनाथ होईल प्रसन्न