MS Dhoni New Role In IPL 2024 l महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल 2023 चे विजेतेपद मिळवून दिले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) एकूण 5 आयपीएल विजेतेपद जिंकली आहेत. आयपीएल 2024 च्या हंगामात MS Dhoni नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत धोनीने फेसबुक पोस्ट करत दिले आहेत. मात्र धोनीची ही फेसबुक पोस्ट चेन्नईच्या चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल झाली आहे.
MS Dhoni New Role In IPL 2024 l धोनीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल :
फेसबुक पोस्ट नंतर महेंद्रसिंग धोनी कर्णधार म्हणून IPL 2024 खेळणार का नाही? मात्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. धोनीने फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “नवीन सीझन आणि नवीन ‘कॅरेक्टर’ची वाट पाहू शकत नाही. सोबत रहा.”
चेन्नईच्या कर्णधाराने या पोस्टमध्ये कोणत्याही प्रकारे खुलासा केला नाही की, तो नवीन हंगामासाठी कोणत्या पात्राबद्दल बोलत आहे. आता यावेळी धोनी चाहत्यांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे हे पाहणे फारच उत्सुकतेचे ठरणार आहे. तसेच धोनीच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये निश्चितच सस्पेन्स वाढवला आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा विजेतेपद पटकावले :
चेन्नई सुपर किंग्जसाठी धोनीचे कर्णधारपद खूप यशस्वी ठरले आहे. माहीच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत पाच विजेतेपदे जिंकली आहेत. गेल्या हंगामात आयपीएल विजेतेपद जिंकल्यानंतर धोनीने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली आहे, ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली MI ला पाच विजेतेपद मिळवून दिले आहेत. 2023 च्या आयपीएलमध्ये रोहितने मुंबईची कमान हाती घेतली होती, परंतु 2024 च्या हंगामासाठी हार्दिक पांड्याने त्याच्या जागी कर्णधार म्हणून निवड केली आहे.
MS Dhoni New Role In IPL 2024 l धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार :
महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार देखील होता. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने टीम इंडियाला 2007 मध्ये टी-20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तीन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. भारताला तीन आयसीसी विजेतेपद मिळवून देणारा धोनी हा आतापर्यंतचा एकमेव कर्णधार आहे.
News Title : MS Dhoni New Role In IPL 2024
महत्त्वाच्या बातम्या-
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींचे जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील
‘आम्ही मराठे करेक्ट कार्यक्रम करु…’; जरांगेंकडून सर्वात मोठा इशारा
‘मी बायकोला सांगितलंय…’; मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याची तूफान चर्चा
मनोज जरांगे पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सगळीकडे एकच चर्चा
महाशिवरात्रीला अशाप्रकारे भोलेनाथाची पूजा करा; होईल मनातील इच्छा पूर्ण