LIC Jeevan Dhara 2 l भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ वेळोवेळी देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या पॉलिसी जारी करत असते. अशातच एलआयसीने एक नवीन पॉलिसी सुरू केली आहे. LIC कंपनीने लाँच केलेल्या या विमा योजनेचं नाव एलआयसी जीवन धारा-2 असं ठेवलं आहे. नागरिकांना या विमा योजनेमध्ये आयुष्यभर परताव्याची हमी देखील मिळणार आहे.
LIC पॉलिसी प्रीमियम :
तुम्ही भारताचे रहिवासी असाल तर तुम्हाला माहिती असेल की भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. परदेशातील लोक देखील LIC मध्ये जीवन विमा काढतात. तुम्ही अद्याप कोणतीही एलआयसी पॉलिसी काढली नसेल तर तुम्ही एलआयसीने जारी केलेली नवीन पॉलिसी जीवन धारा 2 घेणे फायद्याचे ठरू शकते. या पॉलिसीचा प्रीमियम फक्त 24990 रुपये आहे.
LIC Jeevan Dhara 2 l तसेच LIC ची नवीन पॉलिसी जीवन धारा 2 ही एक नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटेड अॅन्युइटी योजना आहे. ही वैयक्तिक बचत आणि स्थगित वार्षिकी योजना आहे. या पॉलिसीमध्ये अॅन्युइटीची हमी सुरुवातीपासूनच दिली जाते. तसेच यामध्ये संभाव्य पॉलिसी धारकाला 11 अॅन्युइटी पर्याय (LIC Jeevan Dhara 2) मिळतील आणि ही पॉलिसी खरेदी करण्याच्या वयात, उच्च वार्षिकी दर आणि जीवन कर देखील उपलब्ध असेल.
LIC पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी काय वयोमर्यादा हवी? (LIC Jeevan Dhara 2) :
याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे जीवन धारा 2 या पॉलिसीचा लाभ घेयचा असेल तर एक अट आहे. ती म्हणजे या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी किमान वय 20 वर्षे असणार आहे तर जास्तीस्त जास्त वय 80 वर्षे हवे.
LIC च्या जीवन धारा-2 योजेनचा लाभ घेयचा असल्यास ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही प्रकारे लाभ घेता येईल. तसेच या पॉलिसी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास तुमच्या जवळच्या LIC कार्यालयाला भेट द्यावी.
News Title : LIC Jeevan Dhara 2 :
महत्त्वाच्या बातम्या-
Kia Seltos l Kia कंपनीने लाँच केले Seltos चे 5 जबरदस्त मॉडेल! जाणून घ्या फीचर्स
Ram Mandir l घरबसल्या पाहता येणार भक्तांना राम मंदिर सोहळा! पहा कधी आणि कुठे
Horoscope l प्रभू रामाच्या आशिर्वादाने या राशींना आजचा दिवस जाणार लाभदायक
Ram Mandir Inauguration l राम मंदिरा संदर्भात सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय