Best Two Wheelers under 1 Lakh l कमी बजेटमध्ये बाईक खरेदी करायची? तर मग या 5 बाईक आहेत सर्वात बेस्ट

Best Two Wheelers under 1 Lakh l देशात अनेक आघाडीच्या दुचाकी कंपन्या आहेत. या कंपन्या ग्राहकांसाठी नवनमविण बाईक्स लाँच करत असतात. मात्र ग्राहकांना कमी बजेट (Best Two Wheelers under 1 Lakh) मध्ये दुचाकी घेयची असेल तर बाजारात 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत कोणकोणत्या बाईक आहेत ते जाणून घेऊयात…

हिरो स्प्लेंडर प्लस :

हिरो स्प्लेंडर प्लस ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 75,141 रुपये आहे. भारतात या बाईकचे 3 प्रकार आहेत. तसेच ही बाईक 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या बाइकमध्ये 97.2 सीसी बीएस6-2.0 इंजिन आहे जे 8.02 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. Hero Splendor Plus या बाईकचे वजन 112 kg आहे आणि 9.8 लिटरची इंधन टाकी आहे.

Honda Activa 6G :

Honda Activa 6G स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 76,234 रुपये आहे. हे 5 प्रकार आणि 8 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 109.51cc BS6-2.0 इंजिन आहे, जे 7.84 PS पॉवर आणि 8.90 Nm टॉर्क जनरेट करते. तसेच या बाइकमध्ये 5.3 लीटरची इंधन टाकी आहे.

सुझुकी ऍक्सेस 125 :

Suzuki Access 125 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 79,899 रुपये आहे. भारतात या बाईकचे 4 प्रकार आणि 15 रंगांमध्ये उपलब्ध आहे. Access 125 मध्ये 124 cc BS6-2.0 इंजिन आहे, जे 8.7 PS पॉवर आणि 10 Nm टॉर्क जनरेट करते. Suzuki Access 125 बाईकचे वजन 103 किलो आहे आणि त्यात 5 लिटरची इंधन टाकी आहे.

Honda SP 125 :

Honda SP 125 बाईकची एक्स-शोरूम किंमत 86,017 रुपये आहे. हे 3 प्रकार आणि 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. SP 125 मध्ये 123.94cc BS6-2.0 इंजिन आहे, जे 10.87 PS ची पॉवर आणि 10.9 Nm टॉर्क जनरेट करते. यात पुढील आणि मागील ड्रम ब्रेक आहेत. Honda SP 125 चे वजन 116 kg आहे आणि त्यात 11.2 लीटरची इंधन टाकी आहे. (Best Two Wheelers under 1 Lakh)

Honda Shine 125 :

Honda Shine या बाईकची एक्स-शोरूम किंमत 79,800 रुपये आहे. हे 2 प्रकार आणि 5 रंगांमध्ये उपलब्ध आहे. शाइनमध्ये 123.94 ccBS6-2.0 इंजिन आहे, जे 10.74 PS पॉवर आणि 11 Nm टॉर्क जनरेट करते. यात 10.5 लीटरची इंधन टाकी आहे.

News Title : Best Two Wheelers under 1 Lakh

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange Patil Live l जाणून घेऊयात सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?

Maratha Reservation l मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश; मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य

Sania Mirza Instagram Post l सानिया मिर्झाची इंस्टग्राम पोस्ट होतेय ट्रोल! पाहा नक्की काय आहे

Fighter Online Leaked l या वेबसाईटवर फायटर चित्रपट ऑनलाईन लीक! निर्मात्यांना मोठा धक्का

Winter Child Care Tips l हिवाळ्यात लहान मुलांना आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती?