‘तुमचं खरं रुप समोर येत आहे, समाज एवढा भोळा नाही..’; ‘या’ मंत्र्यानी जरांगे पाटलांना सुनवलं

Manoj Jarange Patil | गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणासाठी लढताना दिसत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी असून ते आता आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जरांगेंनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर तसंच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर सडकून टिका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. मात्र आता नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंना सुनवलं.

काय म्हणाले विखे पाटील?

माध्यमांशी बोलत असताना विखे पाटील म्हणाले, मराठा सामाजाला आरक्षण मिळावं यासाठी लाखो मराठा बांधाव तुमच्या पाठीमागे उभे आहेत. मात्र आता लोकांपुढे तुमचं खरं रुप समोर येत आहे. समाज एवढा भोळा नाही. समाज तुमच्या कोणत्याही भूमिकेला बळी पडणार नाही.

पुढे ते म्हणाले की, मनोज जरांगेंना (Manoj Jarange Patil) मराठा समाजाने आदाराचे स्थान दिले होते. मात्र आता मी म्हणजे मराठा समाज हे मनोज जरांगे पाटलानी डोक्यातून काढून टाकावं. एवढंच नाही तर जरांगेंनी मराठा समाजाच्या भावनांशी खेळण बंद करावं.

साखळी उपोेषण 3 मार्चपासून-

“मी माझ्या समाजासाठी काम करत राहीन, लढत राहीन.” दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी यावेळी जाहीर केलं की, ते आणि त्यांचे सहकारी 3 मार्चपासून साखळी उपोषण करतील. पाटील यांनी 3 मार्च रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. परंतु, आता त्यांनी परिक्षांमुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

माझा फोकस फक्त आरक्षणावर-

प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभेचं तिकिट देण्याबाबत मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी प्रकाश आंबेडकर यांचा कसा शब्द टाळू, तरीही माझा फोकस फक्त आरक्षणावर आहे. पुढे ते म्हणाले की, “माझा लढा हा राजकीय लढा नाही तर माझा समाजिक लढा आहे. मी माझ्या समाजाविरोधात जाणार नाही”.

News Title : manoj jarange patil criticized by radhakrishna vikhe patil

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझं लक्ष…’; लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

‘तू बामणाचा असला तरी मी…’; जरांगेंनी व्यक्त केली दिलगिरी

1 मार्चपासून नियमांत मोठे बदल होणार; नागरिकांच्या खिशावर होणार थेट परिणाम

मार्चमध्ये लाँग वीकेंडच नियोजन करताय तर या ठिकाणांना भेट द्या!

“…त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही”, मनोज जरांगेंनी केलं मोठं विधान!