चाहत्यांनो… दोन मुलींसोबत ब्रेकअप केल्यानंतर मुनावर फारुकी पुन्हा प्रेमात पडला?

Munavar Farooqui Girlfriend l भारतीय स्टँड-अप कॉमेडियन, रॅपर आणि गायक मुनावर फारुकी (Munavar Farooqui) याने अलीकडेच बिग बॉस 17 ची ट्रॉफी जिंकली आहे. याआधीही 2022 मध्ये अभिनेत्री कंगना रणौतने होस्ट केलेल्या रिॲलिटी टीव्ही शो ‘लॉक अप’ सीझन 1 च्या ट्रॉफीवर देखील मुनव्वरने बाजी मारली होती. पण ‘लॉक अप’च्या तुलनेत बिग बॉसचा प्रवास त्याच्यासाठी खूपच कठीण होता.

या शोदरम्यान मुनावर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान आणि नाझिला सितांशी यांनी त्यांच्यावर ‘फसवणूक’ केल्याचा आरोप केला होता. मुनव्वर एकाच वेळी दोघांना डेट करत होता आणि त्याने केलेल्या विश्वासघातामुळे ते त्याच्यासोबतचे नाते तोडत असल्याचे या दोघींनी सांगितले होते.

Munavar Farooqui Girlfriend l मुनावर फारुकी पुन्हा एकदा चर्चेत :

मात्र आता मुनावर फारुकी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु आहे. या प्रेमाच्या आठवड्यात मुनावरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये तो एका मुलीचा हात धरलेला दिसत होता. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो पाहिल्यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला की त्यांचा आवडता कॉमेडियन मुनावर पुन्हा प्रेमात पडला आहे.

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होताच मुनावर फारुकीने (Munavar Farooqui) या अफवेला दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, मुलीसोबतची ही पोस्ट त्याच्या आगामी व्हिडिओबद्दल होती असल्याचे स्पष्ट केले आहे.

Munavar Farooqui Girlfriend l इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत मुनावरने केला खुलासा :

इंस्टाग्राम स्टोरीवर अपडेट पोस्ट करत मुनावरने (Munavar Farooqui) लिहिले की, “चील फ्रेंड्स, सिंगल.” बिग बॉस 17 मधील त्याच्या प्रवासाच्या शेवटी, मुनव्वरने त्याच्या भूतकाळाबद्दल अनेक खुलासे केले होते. मुनावर यांनी सांगितले होते की, तो घटस्फोटित आहे आणि त्याच्या आधीच्या लग्नापासून त्याला एक मूल आहे.

इतकेच नाही तर मुनव्वरने आपल्या आव्हानात्मक घटस्फोटानंतर अनेक महिलांना डेट केल्याची कबुलीही दिली होती. बिग बॉसच्या प्रवासात मुनव्वरचे नाव प्रियंका चोप्राची धाकटी बहीण मन्नारा फारुकी हिच्याशीही जोडले गेले होते, परंतु दोघांमध्ये मैत्रीशिवाय दुसरे काहीही नसल्याचे दोघांनी सांगितले होते.

News Title : Munavar Farooqui falls in love again 

महत्वाच्या बातम्या – 

इन्स्टाग्रामच भन्नाट फीचर्स; AI च्या मदतीने मेसेज लिहता येणार

राज्य सरकारचं टेन्शन वाढणार! या कारणामुळे मनोज जरांगे आजपासून उपोषण करणार

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे राजकारणातील व्यक्तींवर विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवतील

व्हॅलेंटाईन्स डे निम्मित हे जुने रोमँटिक चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहता येणार! पाहा लिस्ट

पुणेकरांनो… या महामार्गावरील वाहतूक बंद होणार; असा असेल पर्यायी मार्ग