इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; विराट कोहली सामन्यांमधून बाहेर; पण का?

IND vs ENG Test Series l BCCI ने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये 17 खेळाडूंना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. या कसोटी सामन्यात एका नव्या चेहऱ्याला संघात संधी मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये उपकर्णधार जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज यांच्यासह युवा खेळाडू आकाश दीपचाही संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकी खेळाडूंमध्ये रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यासह वॉशिंग्टन सुंदरला देखील टीम इंडियात स्थान मिळाले आहे.(IND vs ENG Test Series)

IND vs ENG Test Series l विराट कोहली, श्रेयस अय्यर कसोटी मालिकेतून बाहेर? :

स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली गेल्या तीन कसोटी सामन्यात संघात परतला नाही. वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटीतही तो टीम इंडियातुन बाहेर होता. तर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे शेवटच्या तीन कसोटीत संघाचा भाग असणार नाही. म्हणजेच श्रेयस अय्यर कसोटी मालिकेतून पूर्णपणे बाहेर आहे.

बीसीसीआयने संघाच्या घोषणेसह प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नाही. BCCI बोर्ड कोहलीच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर आणि समर्थन करत आहे. (IND vs ENG Test Series)

यासह ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचा सहभाग बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाकडून फिटनेस क्लिअरन्सच्या अधीन आहे. याचा अर्थ बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला मॅच फिट घोषित केल्यावरच त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल.

IND vs ENG Test Series l भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याचे वेळापत्रक :

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी 2024 रोजी राजकोट येथे खेळवला जाणार आहे, तर चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारी 2024 रोजी रांची येथे खेळवला जाईल. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 07 मार्च 2024 पासून धरमशाला येथे पार पडणार आहे. (IND vs ENG Test Series)

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.

News Title : IND vs ENG Test Series

महत्वाच्या बातम्या – 

चाहत्यांनो… दोन मुलींसोबत ब्रेकअप केल्यानंतर मुनावर फारुकी पुन्हा प्रेमात पडला?

इन्स्टाग्रामच भन्नाट फीचर्स; AI च्या मदतीने मेसेज लिहता येणार

राज्य सरकारचं टेन्शन वाढणार! या कारणामुळे मनोज जरांगे आजपासून उपोषण करणार

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे राजकारणातील व्यक्तींवर विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवतील

व्हॅलेंटाईन्स डे निम्मित हे जुने रोमँटिक चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहता येणार! पाहा लिस्ट