या ठिकाणी मिळते जगातील सर्वात महाग चॉकलेट; किंमत वाचून व्हाल हैराण!

highest chocolate price in india l जगभरात मोजके अपवाद सोडले तर चॉकलेट हा लहान-थोरांपासून सर्वांचाच आवडीचा पदार्थांपैकी एक आहे. आज पर्यंत आपण अनेकदा आनंदाचे क्षण साजरे केले असतो आणि त्या आनंदाच्या क्षणांचा आनंद आपण चॉकलेट खाऊन नक्कीच द्विगुणित केला असणार. एवढेच नव्हे तर एखाद्या सेलिब्रेशनमध्ये केक किंवा पेस्ट्रीसारखे चॉकलेट्स नसतील तर ते सेलिब्रेशनच अपुरेच वाटते. परंतु तुम्हाला माहिती आहे का जगभरात चॉकलेटचे असे काही प्रकार आहेत, जे अत्यंत महागडे विकले जातात. त्यामुळे आज व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने अशाच काही महागड्या चॉकलेटविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

La Madeline au Truffe : महागड्या चॉकलेट्सच्या यादीत पहिलं नाव आहे ते म्हणजे La Madeline au Truffe. हे निप्सचिल्ड नावाच्या कंपनीने तयार केलं आहे. हे चॉकलेट ऑर्डर मिळाल्यानंतरच बनवले जाते तर एकदा ऑर्डरनंतर, ते 14 दिवसांच्या आत विक्री केले जाते. हे चॉकलेट दुर्मिळ मशरूमपासून बनवले जाते असे सांगण्यात येत. ज्याची किंमत भारतीय रुपयात 80 ते 84 हजार रुपये प्रति किलो इतकी आहे.

TO’AK : टोआक चॉकलेटचं हेदेखील जगातील महाग चॉकलेट पैकी एक आहे. हे चॉकलेट साधारणतः 50 ग्रॅमच्या बारमध्ये येत असून प्रत्येक बारची किंमत सुमारे 20 ते 22 हजार रुपयांपर्यंत आहे. जगात सध्याच्या घडीला या चॉकलेटचे फक्त 574 बार अस्तित्वात आहेत.

highest chocolate price in india l Noka : नोका चॉकलेट हे चॉकलेट एक कॅनडियन कंपनी बनवते. तसेच हे जगातील सर्वात महागडं चॉकलेट असल्याचे देखील काही काळापूर्वी फोर्ब्स मॅगझिनमध्ये देखील नोंद झाली होती. या चॉकलेटची किंमत साधारण 330 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात तब्बल 24602.21 रुपये आहे. तर त्याच्या बॉक्सची किंमत हि साधारण 71 हजार हुन अधिक आहे

frozen hot chocolate : सेरेंडिपिटी 3 नावाच्या रेस्टॉरंटने काहीवर्षांपूर्वी आपल्या मिठाईच्या यादीत फ्ररोजेन हाउट चॉकलेटचा समावेश करून एक जागतिक विक्रम केला आहे. कारण या चॉकलेटची किंमत 21 लाख रुपये असल्याचे सांगतले जाते.

ले चॉकलेट बॉक्स हे जगातील सर्वात महाग चॉकलेट आहे. ज्याची एका बॉक्सची किंमत भारतीय रुपयांमध्ये 12 कोटी पन्नास लाख रुपये आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला चॉकलेटसह हार, झुमके, अंगठ्या आणि ब्रेसलेट मिळतील, तेही हिरे आणि अनेक मौल्यवान दगडांनी बनवलेले.

highest chocolate price in india l दरम्यान, असे अनेक नामांकित चॉकलेट जगभरात आहेत ज्याची किंमत भारतीय रुपयात 30 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

News Title : highest chocolate price in india

महत्वाच्या बातम्या – 

फेसबुक लाईव्ह करत ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडणारा आरोपी कोण? पाहा Facebook Live व्हिडीओ

पालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलल्या, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा

नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? या ठिकाणी तुम्हाला मिळेल 60 हजारापर्यंत डिस्काउंट

आजचे राशिभविष्य! या राशीच्या कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी आजाराने ग्रस्त होतील

अरे वा…लुना मोपेड लॉन्च! फुल चार्जमध्ये धावणार तब्बल इतके किलोमीटर; ‘ही’ असतील खास वैशिष्ट्य