पुणेकरांनो… या महामार्गावरील वाहतूक बंद होणार; असा असेल पर्यायी मार्ग

Pune-Bangalore National Highway l पुणे-बंगळुरू महामार्गावर प्रवास करण्याआधी हि बातमी एकदा वाचाच. कारण पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bangalore National Highway) सहा पदरीकरणांतर्गत उचगाव व सरनोबतवाडी येथील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणासाठी ही वाहतूक बंद करावी लागणार असल्याची माहिती ठेकेदारांनी दिली आहे.

या वाहुतक बंदमुळे या ठिकाणांहून शहरात ये-जा करण्यासाठी या भुयारी मार्गावरील वाहतूक मार्ग विविध पर्यायी मार्गांनी वळवण्याचा प्रस्ताव ठेकेदार कंपनीने पोलिस अधीक्षकांकडे दिला आहे. त्यामुळे आता पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune-Bangalore National Highway l प्रथमतः वाहतूक पोलिसांकडून पाहणी होणार :

मात्र अचानकपाने वाहतूक मार्ग बदल्यात येत नसल्याने प्रथमतः वाहतूक पोलिसांकडून याची पाहणी करावी लागेल. तसेच सेवा रस्ते पूर्ण होऊन सुरू होत नाहीत तोपर्यंत पर्यायी मार्गाने वाहतूक वळवू नये असा अभिप्राय देण्यात आला आहे.

तसेच पुणे-बंगळुरू महामार्गावरील कागल ते पेठनाका भागाचे काम करणाऱ्या रोडवे सोल्युशन इंडिया इन्‍फ्रा लि.च्या प्रकल्प व्यवस्थापकांनी पर्यायी मार्गाच्या प्रस्तावाला परवानगी मिळावी म्हणून मागणी करण्यात आली आहे.

Pune-Bangalore National Highway l अशाप्रकारे वाहतूक मार्ग बदलण्यात येणार? :

लक्ष्मी टेकडी, अंबाबाई मंदिर ते रेमंड चौक, फाईव्ह स्टार एमआयडीसीमार्गे (MIDC) गडमुडशिंगी, सांगवडे, हुपरी, रेंदाळला जाणाऱ्या वाहनांसाठी पुढील पर्यायी मार्ग म्हणून निवडले आहेत. तसेच यामध्ये हुपरी-पट्टणकोडोली मार्गे कोल्हापूर शहरात जाणारी वाहने कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसीतून (Gokul Shirgaon MIDC) बेंगळुरू-पुणे महामार्गावरून ठरलेल्या ठिकाणी जातील.

तसेच सांगवडे फाट्याकडून शहरात जाणारी वाहने हुपरी-कोल्हापूर रोड व गोकुळ शिरगाव एमआयडीसी बेंगळुरू-पुणे मार्गे वळविण्यात येणार असल्याचा प्रसव दिला आहे. तर गडमुडशिंगी ते उचगाव मार्गे जाणारी वाहने गांधीनगर, तावडे हॉटेल, उजळाईवाडी, केआयटी कॉलेज भुयारी मार्गे वळवली जाऊ शकतात.

तसेच कोल्हापूर शहरातील टेंबलाईवाडी ते गडमुडशिंगी, हुपरी-पट्टणकोडोलीकडे जाणारी वाहने गांधीनगर-तावडे हॉटेल व उजळाईवाडी, केआयटी कॉलेज भुयारी मार्गे वळविण्याचे ठरवले असल्याचे माहिती पत्रकात सांगण्यात आले आहे.

News Title : Pune-Bangalore National Highway

महत्वाच्या बातम्या – 

या ठिकाणी मिळते जगातील सर्वात महाग चॉकलेट; किंमत वाचून व्हाल हैराण!

फेसबुक लाईव्ह करत ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडणारा आरोपी कोण?

पालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलल्या, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा

नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? या ठिकाणी तुम्हाला मिळेल 60 हजारापर्यंत डिस्काउंट

आजचे राशिभविष्य! या राशीच्या कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी आजाराने ग्रस्त होतील