इन्स्टाग्रामच भन्नाट फीचर्स; AI च्या मदतीने मेसेज लिहता येणार

Instagram Working on AI Message Writing Feature l इन्स्टाग्राम वेळोवेळी अनेक बदल करत असतो. तुम्हीही इन्स्टाग्राम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. इंस्टाग्राम आता एक नवीन फीचर विकसित करत आहे. म्हणजेच तुम्हाला मेसेज लिहिण्याबाबत जास्त काळजी करण्याची गरज भासणार नाही. तुम्ही इन्स्टाग्रामवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने अगदी सहजरित्या मेसेज लिहू शकता.

Instagram Working on AI Message Writing Feature l इन्स्टाग्रामवर AI च्या मदतीने अगदी सहजरित्या मेसेज लिहता येणार :

मिळालेल्या माहितीनुसार… इन्स्टाग्रामचे नवीन फीचर युजर्सना बरीच सुविधा देऊ शकते. एआय टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही कोणताही संदेश पाठवू शकाल जो खूप सोपा आणि सर्जनशील असेल. अलीकडेच ॲपचे संशोधक ॲलेसँड्रो पलुझी यांनी याबाबतचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये ‘Write With AI’ असे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र या फीचरवर सध्या काम चालू आहे त्यानंतर हे फीचर्स लाँच करण्यात येणार आहे.

कंपनी हे AI फीचर्स इंस्टाग्राम ॲपमध्ये जोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्याच्या मदतीने तुम्ही Google च्या मॅजिक कंपोझ वैशिष्ट्याप्रमाणे वेगवेगळ्या शैलींमध्ये संदेशाचे वर्णन करू शकता. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होण्याची संधी मिळेल. तुम्ही ते फीचर्स वापरल्यास ते तुमचा संदेश अधिक मनोरंजक बनवण्यास सुसज्ज असणार आहे.

कंपनीच्या या फीचर्समुळे यूझर्सना मदत मिळणार (Instagram Working on AI Message Writing Feature) :

सध्या इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा या फीचर्सवर काम करत आहे. एआय फीचरच्या मदतीने युजर्सना पूर्णपणे नवीन अनुभव मिळणार आहे. इतर लोकांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुलभ करण्याच्या उद्देशाने काम केले जात आहे. (Instagram Working on AI Message Writing Feature)

Meta AI च्या मदतीने तुम्ही ग्रुप चॅटमध्ये हवी त्या पद्धतीने चॅट करू शकता. AI च्या मदतीने तुम्ही विनोद देखील छान प्रकारे लिहू शकता. तसेच वादविवाद देखील सोडवू शकता आणि कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देखील देऊ शकता. त्यामुळे कंपनीच्या या फीचर्समुळे यूझर्सना चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.

News Title : Instagram Working on AI Message Writing Feature

महत्वाच्या बातम्या – 

राज्य सरकारचं टेन्शन वाढणार! या कारणामुळे मनोज जरांगे आजपासून उपोषण करणार

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे राजकारणातील व्यक्तींवर विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवतील

व्हॅलेंटाईन्स डे निम्मित हे जुने रोमँटिक चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहता येणार! पाहा लिस्ट

पुणेकरांनो… या महामार्गावरील वाहतूक बंद होणार; असा असेल पर्यायी मार्ग

या ठिकाणी मिळते जगातील सर्वात महाग चॉकलेट; किंमत वाचून व्हाल हैराण!