व्हॅलेंटाईन्स डे निम्मित हे जुने रोमँटिक चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहता येणार! पाहा लिस्ट

Old Romantic Movies Re-Watched In Theaters l प्रेमीयुगलांचा सण म्हणजेच व्हॅलेंटाईन डे वीक सध्या सुरु आहे. या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक जोडपी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद घेतात. मात्र अशातच आता रोमँटिक जोडप्यांसाठी एक खुशखबर आहे. व्हॅलेंटाईन डे निमित सिनेप्रेक्षकांना मनोरंजनाच्या प्रेमाची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. कारण आजपासून म्हणजेच 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत एक फिल्मफेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे.

Old Romantic Movies Re-Watched In Theaters l हे जुने रोमँटीक चित्रपट पुन्हा एकदा थेटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार :

व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine’s Day) दिवशी बॉलीवूडमधील गाजलेले जुने रोमँटीक चित्रपट पुन्हा एकदा थेटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या प्रियकरासोबत जूनये चित्रपट पाहू शकता. (Old Romantic Movies Re-Watched In Theaters)

या फिल्मफेस्टिवल निमित्ताने प्रेक्षक हिंदी, पंजाबी, तेलुगू, तामिळयासह इतर अनेक भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र हा फेस्टिवल ठराविक शहरांमध्ये असणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, गोवा, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, कोची, लखनऊ, इंदौर, जयपुर या शहरांचा समावेश आहे. तसेच हे चित्रपट PVR, INOX, CINEPOLIS या चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे चित्रपट पाहण्यासाठी तिकीट दर 112 रुपयांपासून पुढे सुरु होणार आहे.

हे चित्रपट पुन्हा पाहता येणार चित्रपटागृहात (Old Romantic Movies Re-Watched In Theaters) :

या चित्रपटांच्या यादीमध्ये ‘टायटॅनिक’, ‘प्यार का पंचनामा’, ‘मोहब्बते’, ‘जब वी मेट’, ‘ये जवानी है दीवानी’, , ‘सीता रामन’, ‘विन्नैथांडी वरुवाया’, ‘प्रेमम’, ‘वीर-झारा’, ‘सप्त सागरदाचे एलो – साइड ए एंड साइड’, ‘दिल दिया गल्ला’ या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या चित्रपटांसोबत अजून 26 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Old Romantic Movies Re-Watched In Theaters)

News Title : Old Romantic Movies Re-Watched In Theaters

महत्वाच्या बातम्या – 

पुणेकरांनो… या महामार्गावरील वाहतूक बंद होणार; असा असेल पर्यायी मार्ग

या ठिकाणी मिळते जगातील सर्वात महाग चॉकलेट; किंमत वाचून व्हाल हैराण!

फेसबुक लाईव्ह करत ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडणारा आरोपी कोण?

पालकांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलल्या, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा

नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? या ठिकाणी तुम्हाला मिळेल 60 हजारापर्यंत डिस्काउंट