राज्य सरकारचं टेन्शन वाढणार! या कारणामुळे मनोज जरांगे आजपासून उपोषण करणार

Manoj Jarange l 26 जानेवारीला मुंबईच्या रस्त्यावर हजारो मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणासाठी आले होते.त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्यासंदर्भात अध्यादेश जारी केला.

Manoj Jarange l मनोज जरांगे पाटलांचं आजपासून आमरण उपोषण :

मात्र अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून (10 फेब्रुवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती. यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 9 फेब्रुवारी 2024 पर्यंतची डेडलाईन देखील दिली होती. (Manoj Jarange)

Manoj Jarange l मात्र आता 9 फेब्रुवारी 2024 ही तारीख उलटून देखील गेली आहे. तरीसुद्धा सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे नाही. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. तसेच राज्य सरकारने मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते.

Manoj Jarange l माझ्याविरोधात काहींनी सुपारी दिली : मनोज जरांगे

तसेच मराठा आंदोलकांच्या पाठपुराव्याला यश येऊन सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र सरकारने जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाची फसवणूक केल्याची टीका सोशल मीडियामधून वारंवार होत आहे. या टीकेवरही जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला असून टीकाकारांना थेट इशाराच दिला आहे. (Manoj Jarange)

यावेळी जरांगे पाटील म्हणले की, माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतली आहे. यापुढे ते शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच 10 फेब्रुवारी 2024 पासून आपण कठोर आमरण उपोषण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं सांगितलं आहे. (Manoj Jarange)

दरम्यान मराठा बांधवांनी देखील या उपोषणाला पाठींबा देऊन आपापल्या आमदारांना तातडीने फोन करावे, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. तसेच मी देखील सर्व आमदारांना विनंती करतो, की मराठ्यांच्या मुलाबाळांसाठी आपण कायद्याच्या बाजूने उभा राहावे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

News Title : Maratha Reservation Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या – 

Today Horoscope l आजचे राशिभविष्य! या राशीचे राजकारणातील व्यक्तींवर विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवतील

व्हॅलेंटाईन्स डे निम्मित हे जुने रोमँटिक चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात पाहता येणार! पाहा लिस्ट

पुणेकरांनो… या महामार्गावरील वाहतूक बंद होणार; असा असेल पर्यायी मार्ग

या ठिकाणी मिळते जगातील सर्वात महाग चॉकलेट; किंमत वाचून व्हाल हैराण!

फेसबुक लाईव्ह करत ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळ्या झाडणारा आरोपी कोण?