सिनेरसिकांनो ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल

Merry Christmas OTT l कतरिना कैफ आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपट मेरी ख्रिसमस नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, परंतु समीक्षक श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाने प्रभावित झाले आहेत. कतरिना आणि विजयची जोडी या चित्रपटात पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. मेरी ख्रिसमस कधी आणि कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे हे जाणून घेऊयात…

Merry Christmas OTT l मेरी ख्रिसमस या ओटीटी पल्लटफॉर्मवर होणार रिलीज :

फिल्म कम्पेनियनच्या मते, मेरी ख्रिसमस लवकरच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांचा ‘मेरी ख्रिसमस’ हा नामांकित चित्रपट चित्रपटगृहात हिंदी आणि तामिळ या दोन भाषांमध्ये 12 जानेवारी 2024 ला रिलीज झाला होता. आता या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे.

सर्वात विशेष बाब म्हणजे या सिनेमामध्ये कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकली आहे. आता हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी हा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Merry Christmas OTT l बॉक्स ऑफिसवर मेरी ख्रिसमस केली जबरदस्त कामगिरी :

कतरिना आणि विजयच्या मेरी ख्रिसमस या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 12 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 2.55 कोटींची ओपनिंग केली होती. या चित्रपटाने जवळपास 10 कोटींची कमाई केली आहे.

मेरी ख्रिसमस या नामांकित या चित्रपटामध्ये कतरिना कैफ आणि विजय सेतुपती हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर याशिवाय यांच्यासोबतच आदिती गावेकर, राधिका आपटे, संजय कपूर, टिनू आनंद आणि विनय पाठक या दिग्गज कलाकारांनी देखील काम केलं आहे.

News Title : Merry Christmas Movie OTT Relesed Date

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ जिल्ह्यांत पावसाची दाट शक्यता

मराठा समाज आक्रमक! गृहविभागाने ‘या’ जिल्ह्यांच्या इंटरनेट आणि एसटी सेवा केल्या बंद

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीने आर्थिक देवाणघेवाण करताना सावध रहा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न जामनगरमध्ये होणार? काय आहे जामनगरचे कनेक्शन

महिंद्रा कंपनीने लाँच केली जबरदस्त कार; 6 एअरबॅगसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये मिळणार; पाहा किंमत