‘तू बामणाचा असला तरी मी…’; जरांगेंनी व्यक्त केली दिलगिरी

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी रात्र आणि दिवस एक करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण करत होते. मात्र लाखो मराठा बांधवांनी त्यांना विनंती केल्यानंतर जरांगेंनी अखेर उपोषण मागे घेतलं. दोन दिवसांपूर्वी जरांगे आक्रमक झाल्याचं चित्र पहायाला मिळालं. एवढंच नाही तर जरांगेंनी राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याची घोषणा देखील केली होती. शिवाय जरांगे मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र त्यांना मराठा बांधवांनी विनंती केल्याने जरांगेंनी रात्रीतूनच यू टर्न घेतला. दरम्यान, या वेळी जरांगेंनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

काय म्हणाले होते जरांगे?

आक्रमक झालेले जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारवर तर निशाणा धरलाच शिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरली. या वेळी जरांगे म्हणाले की, “तुझ्यात दम असेल, तर सागर बंगल्यावर ये.

तू बामणाचा असला, तरी मी खानदानी मराठा आहे. अरे दम लागतो. घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला. बघतो सत्ता कशी येते, दम लागतो. एक तासात सांगतो, तो रात्रीच करणार होता.” जनता काम केल्यावर आदर करते” असं जरांगे म्हणाले होते.

जरांगेंनी मागितली माफी-

आमरण उपोषण सुरु असताना मी आक्रमक होऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबदल आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यांना मी आई-बहिणीवरुन अपशब्द वापरले असतील तर मी माफी मागतो शिवाय याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. त्यावेळी मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनाची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले होते.

आधिवेशनात चर्चा-

सुरु असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात फडणवीसांनी जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. दरम्यान घडलेल्या प्रकारावर जरांगेंनी माफी मागितली आहे. माध्यामांशी बोलत असताना जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबदल मी अपशब्द वापरले त्याबदल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

News Title : manoj jarange patil apologize the mistake

महत्त्वाच्या बातम्या-

मार्चमध्ये लाँग वीकेंडच नियोजन करताय तर या ठिकाणांना भेट द्या!

“…त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही”, मनोज जरांगेंनी केलं मोठं विधान!

मोठी बातमी! मनोज जरांगेंचं एक पाऊल मागे, अखेर….

या महिला क्रिकेटरने चक्क मुंबई इंडियन्सला चारली पराभवाची धूळ

गुड न्यूज! दीपिका पदुकोण आई होणार, ‘या’ महिन्यात होणार डिलिव्हरी