“छात्या दुखल्या तरी पण…”; जरांगेंच्या वक्तव्याने एकच खळबळ

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहेत. मराठा समाजाला 10% टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं तरी देखील जरांगेंना ते मान्य नव्हतं. अखेर त्यांनी सरकारने दिलेलं 10% आरक्षण मान्य केलं. मात्र, ओबीसीमधून आरक्षण पाहिजे त्यासाठी जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केलं आहे. त्यासाठी त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठक घेणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांवर देखील निशाणा साधला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

माध्यमांशी बोलत असताना जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले की, “चंद्रकांत पाटील तिथे बसून चर्चा करतील. पण इकडे येणार नाहीत. ते पळवाट काढतील. आमच्या छात्या दुखायला लागल्या तरी ते येईना. तुमचे डाव तुम्ही कसे यशस्वी करतात ते आम्हीसुद्धा बघू. मला कसे अटक करता तेही बघू. सरकार काय डाव आखत आहे ते मी लिहून ठेवलंय. उद्याच्या बैठकीत मी समाजाला सांगणार आहे. काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील,” असेही मनोज जरांगे म्हणाले.

रास्ता रोकोबाबत जरांगेंचा इशारा-

बोलत असताना मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांना आलेल्या प्रतिबंधक नोटीसीबाबतही भाष्य केलं. त्या नोटिसा स्विकारल्या तरी काही होणार नाही. रास्ता रोको केला म्हणून गुन्हे दाखल केल्यास मला येऊन सांगा. गृहमंत्री यांचं ऐकून गुन्हे दाखल केल्यास जड जाईल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Patil) याआधी उपोषण केलं. त्यानंतर त्यांनी राज्यभर सभा घेतल्या. एवढंच नाही तर गावागावात जाऊन त्यांनी मोर्चा काढला. मात्र तरी देखील जरांगेंना ओबीसीमधून आरक्षण न मिळाल्याने त्यांनी पुन्हा एकदा राज्यभर दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जरांगेंनी माहिती दिली आहे.

अंतरवालीमध्ये बैठक-

फक्त 11 ते 1 या वेळेत रास्ता रोको करा आणि आज संध्याकाळ पासून गावा गावात धरणे आंदोलन करा. उद्या अंतरवालीत मराठा समाजाची बैठक होणार असून ही निर्णायक बैठक होईल, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

News Title : manoj jarange patil criticized chandrakant patil

महत्त्वाच्या बातम्या-

‘उद्या अंतरवाली सराटीमध्ये…’; मराठा आंदोलनाबाबत जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी; महाशिवरात्रीला विशेष रेल्वे धावणार,पाहा वेळापत्रक

पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरवात; अशाप्रकारे करा अर्ज

मोठी बातमी! मार्च महिन्यात ‘या’ दिवशी आचारसंहिता लागू होणार?

जाणून घ्या देशातील 12 ज्योतिर्लिंग कुठे आहेत आणि त्यांची खासियत काय