जाणून घ्या देशातील 12 ज्योतिर्लिंग कुठे आहेत आणि त्यांची खासियत काय

12 Jyotirlingas Of Lord Shiva l देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शिवलिंगाच्या रूपात भगवान शिवाला समर्पित ज्योतिर्लिंग नावाची बारा मंदिरे आहेत. ही मंदिरे भारतभर आहेत आणि हिंदू धर्माचे लोक त्यांना अतिशय पवित्र मानतात. काही मान्यतेनुसार या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये भगवान शिव स्वतः प्रकाशाच्या रूपात विराजमान आहेत. तर आज आपण जाणून घेऊयात ही 12 ज्योतिर्लिंगे कोठे आहेत

12 Jyotirlingas Of Lord Shiva l देशभरात 12 ज्योतिर्लिंगे कुठे आहेत? :

1. सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात : सोमनाथ ज्योतिर्लिंग हे देशातील पहिले ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग गुजरातमध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे, ज्याला सोमनाथ म्हणून ओळखले जाते. शिवपुराणानुसार प्रजापती दक्षने चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला होता, तेव्हा या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करून तपश्चर्या केल्याने चंद्राला शापापासून मुक्ती मिळाली.

2. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश : मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशातील कृष्णा नदीच्या काठी श्रीशैल पर्वतावर वसलेले आहे. त्यामुळे या ठिकाणाला दक्षिणेचे कैलास असेही म्हणले जाते. तसेच या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व संकटे दूर होतात.

3. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश : महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे आहे. हे ज्योतिर्लिंग क्षिप्रा नदीच्या काठी वसलेले आहे. तसेच हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग देखील आहे. तसेच या ठिकाणी दररोज भस्म आरती जगभरात प्रसिद्ध आहे.

4. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश : ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशात स्थित असून नर्मदा नदीच्या काठावर डोंगरावर वसलेले आहे. असे मानले जाते की यात्रेकरू सर्व तीर्थक्षेत्रातून पाणी आणतात आणि ते ओंकारेश्वरला अर्पण करतात, तरच त्यांची सर्व तीर्थक्षेत्रे पूर्ण मानली जातात.

5. केदारनाथ ज्योतिर्लिंग, उत्तराखंड : केदारनाथ ज्योतिर्लिंग फारच प्रसिद्ध आहे. उत्तराखंड येथील अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या काठी केदार नावाच्या शिखरावर हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे. येथून पूर्व दिशेला श्री बद्री विशालचे बद्रीनाथधाम मंदिर आहे. भगवान केदारनाथच्या दर्शनाशिवाय बद्रीनाथची यात्रा अपूर्ण आणि निष्फळ असल्याचे मानले जाते.

6. भीमाशंकर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र : भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर डाकिनी येथे आहे. या ठिकाणी असलेले शिवलिंग खूपच जाड आहे, म्हणून त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात.

7. विश्वनाथ ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश : धार्मिक शहर काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात गंगा नदीच्या काठावर बाबा विश्वनाथाचे मंदिर आहे, जे विश्वनाथ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की, कैलास सोडल्यानंतर भगवान शिवाने येथे आपले कायमचे वास्तव्य केले. (12 Jyotirlingas Of Lord Shiva)

8. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्राच्या नाशिकपासून पश्चिमेला 30 किलोमीटर अंतरावर आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडांनी बनवलेले आहे. शिवपुराणात असे वर्णन आहे की गौतम ऋषी आणि गोदावरीच्या प्रार्थनेवरून भगवान शिवांनी या ठिकाणी निवास करण्याचा निर्णय घेतला आणि ते त्र्यंबकेश्वर नावाने प्रसिद्ध झाले.

9. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड : वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवघर, झारखंड येथे आहे. येथील मंदिर वैद्यनाथधाम म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की, एकदा रावणाने तपश्चर्येच्या जोरावर शिवाला लंकेत नेण्याचा प्रयत्न केला, परंतु मार्गात अडथळा आल्याने शिव अटीनुसार येथे स्थायिक झाला आहे.(Mahashivratri 2024)

10. नागेशवाल ज्योतिर्लिंग, गुजरात : नागेश्वर मंदिर गुजरातच्या बडोदा भागात गोमती द्वारकाजवळ आहे. धार्मिक पुराणांमध्ये भगवान शिवाचे वर्णन सापांचे देव आणि नागेश्वर म्हणजे सापांचे देव असे केले आहे. या ज्योतिर्लिंगाचे नाव भगवान शंकराच्या इच्छेनुसार ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

11. रामेश्वर ज्योतिर्लिंग, तामिळनाडू : रामेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे 11 वे ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग तामिळनाडूमधील रामनाथम नावाच्या ठिकाणी आहे. रावणाच्या लंकेवर स्वारी होण्यापूर्वी रामाने ज्या शिवलिंगाची स्थापना केली होती ते रामेश्वर या नावाने जगप्रसिद्ध झाल्याचे मानले जाते.

12. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र : महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जवळ दौलताबाद जवळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे शेवटचे ज्योतिर्लिंग असल्याचे म्हणले जाते. या ज्योतिर्लिंगाला घुष्मेश्वर असेही म्हणतात. (Mahashivratri 2024)

News Title :  12 Jyotirlingas Of Lord Shiva

महत्त्वाच्या बातम्या-

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पुढील 2 दिवस असेल असणार वातावरण

IPL चा नवा हंगाम, नवा रोल; कॅप्टन कुलच्या एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींचे जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील

‘आम्ही मराठे करेक्ट कार्यक्रम करु…’; जरांगेंकडून सर्वात मोठा इशारा

‘मी बायकोला सांगितलंय…’; मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याची तूफान चर्चा