‘मी कोणालाही त्रास देत नाही, आधी त्यांनी…’; मनोज जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Manoj Jarange Patil | सध्या मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मराठा बांधवांच्या आग्रहाखातर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मात्र, जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार असं म्हटलं आहे. मनोज जरांगेंना लाखो मराठा बांधवांनी पाठिंबा दिला आहे. मात्र मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं असलं तरी सुद्धा आरक्षण मिळेपर्यंत ते आंदोलन करत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

मी कोणालाही त्रास दिला नाही-

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील बोलत असताना सरकारवर निशाणा धरला. यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल देखील केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसात माझ्यावर आरोप केले होते. माझ्यामुळे इतरांना त्रास होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. मात्र, मी एकच सांगतो की, “मी कुणालाही त्रास देत नाही. अधिसूचना त्यांनी काढली. अंमलबजावणी त्यांनी करायला हवी.

या वेळी ते असं देखील म्हणाले की, पूर्वी राजा न्याय द्यायचा. आताच्या राजांना दया माया नाही. जनता बिथरली तर काय करणार आहे. आता तीन राजे आहेत. एक राजा न्याय देत असेल तर दोन राजांनी त्याला साथ द्यावी. यांना गुलालाचा राग आलाय.

रास्ता रोकोबद्दल सूचना-

पूर्वी एक राजा न्याय द्यायचा आता 3 राजे आहेत तरीही न्याय मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर लढाई करत आहोत. फक्त आंदोलकांनी आंदोलन शांत करावं, मग तुमच्यावर कसे गुन्हे दाखल करतात कशा नोटीसा देतात ते बघतो. पुढे ते म्हणाले की, फक्त 11 ते 1 या वेळेत रास्ता रोको करा आणि आज संध्याकाळ पासून गावा गावात धरणे आंदोलन करा. उद्या अंतरवालीत मराठा समाजाची बैठक होणार असून ही निर्णायक बैठक होईल,” असे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी स्पष्ट केलं.

राज्यभर सभा –

मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं असलं तरी, जरांगे पुन्हा एकदा राज्यभर सभा घेत आहेत. सध्या जरांगे बीड दौऱ्यावरुन असून विविध ठिकाणी जाऊन ते बैठक घेत लोकांशी संवाद साधत आहे.

News Title : manoj jarange patil makes big blast about maratha protest

महत्त्वाच्या बातम्या-

“छात्या दुखल्या तरी पण…”; जरांगेंच्या वक्तव्याने एकच खळबळ

‘उद्या अंतरवाली सराटीमध्ये…’; मराठा आंदोलनाबाबत जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी; महाशिवरात्रीला विशेष रेल्वे धावणार,पाहा वेळापत्रक

पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरवात; अशाप्रकारे करा अर्ज

मोठी बातमी! मार्च महिन्यात ‘या’ दिवशी आचारसंहिता लागू होणार?