मोठी बातमी! मार्च महिन्यात ‘या’ दिवशी आचारसंहिता लागू होणार?

Lok Sabha Election 2024 l राज्यात सर्वत्र निवडणुकांचे वारे फिरत आहेत. लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी 14 ते 15 मार्च दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे.

Lok Sabha Election 2024 l 7 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता :

सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील मतदान एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 2019 प्रमाणे यंदाच्या वेळी देखील 7 टप्प्यात निवडणुका होऊ शकतात असे सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत निवडणूक आयोग मंगळवारीम्हणजेच आज पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र, पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार की नाही हे स्पष्ट झालेले नाही.

Lok Sabha Election 2024 l पुढील आठवड्यात तारखा जाहीर होऊ शकतात! :

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतो. सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोग सध्या अनेक राज्यांच्या दौऱ्यावर आहे. सर्व राज्यांतील तयारीचे मूल्यांकन केल्यानंतरच आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.

निवडणूक आयोग सध्या पश्चिम बंगालमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यानंतर निवडणूक आयोगाची टीम उत्तर प्रदेश आणि त्यानंतर जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक अधिकारी 13 मार्चपर्यंत आपला दौरा पूर्ण करणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोग सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेत आहे.

News Title : Lok Sabha Election 2024 Date

महत्त्वाच्या बातम्या-

जाणून घ्या देशातील 12 ज्योतिर्लिंग कुठे आहेत आणि त्यांची खासियत काय

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पुढील 2 दिवस असेल असणार वातावरण

IPL चा नवा हंगाम, नवा रोल; कॅप्टन कुलच्या एका ओळीच्या फेसबूक पोस्टमुळे चर्चेला उधाण

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींचे जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील

‘आम्ही मराठे करेक्ट कार्यक्रम करु…’; जरांगेंकडून सर्वात मोठा इशारा