मार्च महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ‘इतके’ दिवस शेअर मार्केट राहणार बंद! पाहा यादी

Stock Market Holiday in March l भारतीय शेअर बाजारासाठी मार्च महिना फारच महत्वाचा आहे. कारण भारतीय शेअर बाजार या महिन्यात कमी दिवस ट्रेडिंग करणार आहेत. कारण आर्थिक वर्ष 2024 च्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2024 मध्ये भारतीय शेअर बाजार 12 दिवस बंद राहील आणि ट्रेडिंग फक्त 19 दिवसच होईल. 2023-24 हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2024 रोजी संपणार आहे.

Stock Market Holiday in March l मार्चमध्ये तीन सणांमुळे सुट्ट्या असणार :

मार्च महिन्यामध्ये दोन मोठे सण आणि जागतिक शोक दिन येत आहे. त्यानिमित्त या तीन दिवस शेअर बाजार बंद राहतील. हिंदू सण महाशिवरात्री 8 मार्च रोजी आहे आणि या दिवशी शुक्रवारी शेअर बाजार बंद राहणार आहे. 25 मार्च रोजी रंगीत होळी निमित्त सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहेत. याशिवाय ख्रिश्चनांचा शोक दिन गुड फ्रायडे निमित्त शुक्रवार, 29 मार्च रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे.

शुक्रवार 8 मार्च – महाशिवरात्री :

महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या उपासनेचा महान सण आहे. यंदाच्या वर्षी महाशिवरात्री ही 8 मार्च रोजी असून या दिवशी शेअर बाजारात कोणतेही कामकाज होणार नाही. त्याचे पुढील दिवस अनुक्रमे 9 आणि 10 मार्च रोजी शनिवार आणि रविवार आहेत. त्यामुळे शेअर बाजार 3 दिवस बंद राहणार आहे. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन देखील साजरा केला जातो.

Stock Market Holiday in March l सोमवार 25 मार्च- होळी :

होळी हा सण यंदाच्या वर्षी 25 मार्चला आहे. म्हणजेच शनिवार-रविवारमुळे म्हणजेच 23 आणि 24 मार्च रोजी शेअर बाजार बंद राहतील आणि हा वीकेंड सुद्धा लाँग वीकेंड असेल.

शुक्रवार 29 मार्च – गुड फ्रायडे :

गुड फ्रायडे हा सण प्रामुख्याने जगभरात साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर खिळलेल्या स्मरणार्थ हा शोक दिवस मानला जातो. ख्रिश्चनांमध्ये असे मानले जाते की या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळले होते. या दिवशी जागतिक बाजारपेठाही बंद राहतील आणि अमेरिकन बाजारांसह भारतीय बाजारपेठांमध्ये सुट्टी असेल. (Stock Market Holiday in March)

News Title : Stock Market Holiday in March

महत्त्वाच्या बातम्या-

सिनेरसिकांनो ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ जिल्ह्यांत पावसाची दाट शक्यता

मराठा समाज आक्रमक! गृहविभागाने ‘या’ जिल्ह्यांच्या इंटरनेट आणि एसटी सेवा केल्या बंद

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीने आर्थिक देवाणघेवाण करताना सावध रहा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न जामनगरमध्ये होणार? काय आहे जामनगरचे कनेक्शन