भारतीय युवाशक्तीचा विजय! टीम इंडियाने चौथ्या कसोटीत इंग्लंडला लोळवलं, मालिकाही जिंकली!

IND vs ENG 4th Test Match Result Updates l टीम इंडियाने आज रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा 5 गडी राखून हाणून पराभव केला आहे. टीम इंडियाच्या (IND vs ENG 4th Test) या विजयामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे. शुभमन गिल (52*) आणि ध्रुव जुरेल (39*) यांनी भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

IND vs ENG 4th Test Match Result Updates l भारतीय संघाने 3-1 अशी विजयाची आघाडी घेतली :

शुभमन गिल (52*) आणि ध्रुव जुरेल (39*) यांच्यातील सहाव्या विकेटसाठी 72 धावांच्या नाबाद भागीदारीमुळे भारतीय संघाने सोमवारी चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयाची आघाडी घेतली आहे.

इंग्लंड संघाचा कॅप्टन बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून सर्वात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 307 धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडच्या टीमकडे पहिल्या डावाच्या आधारे 46 धावांची आघाडी होती. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली आणि त्यांचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांत आटोपला.

IND vs ENG 4th Test Match Result Updates l ध्रुव जेरलला मिळाला सामनावीर पुरस्कार :

भारतीय संघाने 61 षटकांत पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि 12 वर्षांची मालिका जिंकण्याच्या इंग्लंडच्या आशा धुळीस मिळवल्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि शेवटची कसोटी मालिका केवळ औपचारिक आहे, जी 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG 4th Test) या चौथ्या कसोटी सामन्यात युवा फलंदाज ध्रुव जेरल हा दोन्ही डावात चमकला आहे. ध्रुव जेरलला (Dhurv Jurel) सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात देखील आले आहे. सर्वात कौतुकाची बाब म्हणजे गेल्या 22 वर्षात पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी मालिकेत सामानावीर पुरस्कार जिंकणारा ध्रुव जेरल हा पहिलाच विकेटकीपर ठरला आहे. ध्रुव जुरेलच्या जबरदस्त खेळीने भारतीय संघाने चौथ्या कसोटीत पिछाडीवरून आघाडी घेतली आहे.

News Title : IND vs ENG 4th Test Match Result Updates

महत्त्वाच्या बातम्या-

मार्च महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ‘इतके’ दिवस शेअर मार्केट राहणार बंद! पाहा यादी

सिनेरसिकांनो ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपट ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ जिल्ह्यांत पावसाची दाट शक्यता

मराठा समाज आक्रमक! गृहविभागाने ‘या’ जिल्ह्यांच्या इंटरनेट आणि एसटी सेवा केल्या बंद

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीने आर्थिक देवाणघेवाण करताना सावध रहा