Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं या साठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. जरांगेंच्या आंदोलनाला मराठा बांधव त्यांना पाठिंबा देत आहेत. दरम्यान, जरांगे पाटील सध्या अंतरावाली सराटीमध्ये अमरण उपोषण करत आहेत. जोपर्यंत मराठा सामाजाला आरक्षण नाही मिळणार तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. आक्रमक झालेले जरांगे पाटील काल स्टेजवरुन खाली उतरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी निघाले होते.
पुढे काय घडलं?
सरकारला वारंवार सांगून सुद्धा सरकाने याबदल अद्याप काही निर्णय घेतलेला नाहीये त्यामुळे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाण्याची घोषणा केली. दरम्यान, गावकऱ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम होते. पुढे भांबेरी गावात त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. तर आज सकाळी त्यांनी आपली भूमिका बदलत पुन्हा आंतरवाली सराटी गाठली आहे. तर दुसरीकडे जरांगेंच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
जरांगेंचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात-
सरकार विरोध राज्या राज्यात मराठा समाज आक्रमक झाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. यामुळे जरांगेंचे सहकारी यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. जरांगे यांच्या 5 सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जरांगे पाटील यांचे निकटवर्ती म्हणून समजले जाणाऱ्या श्रीराम कुरणकर, शैलेश पवार, बाळासाहेब इंगळे यांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर बंदी-
मराठा समाज आक्रमक झाल्यामुळे राज्यातील काही भागात सोशल मीडिया बंद करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीड या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी हे आदेश काढले आहेत. सोशल मीडियावर अनेक पोस्ट, व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हा निरण्य घेण्यात आला आहे.
News Title : manoj jarange patil got big shocked
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ जिल्ह्यांत पावसाची दाट शक्यता
मराठा समाज आक्रमक! गृहविभागाने ‘या’ जिल्ह्यांच्या इंटरनेट आणि एसटी सेवा केल्या बंद
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तीने आर्थिक देवाणघेवाण करताना सावध रहा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न जामनगरमध्ये होणार? काय आहे जामनगरचे कनेक्शन
महिंद्रा कंपनीने लाँच केली जबरदस्त कार; 6 एअरबॅगसह अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये मिळणार; पाहा किंमत